शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयांचे मोफत वाटप


नळदुर्ग, दि. १६ :

   शिवराय मनामनात—शिवजयंती घराघरात हा  संकल्प  करुन  युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने ऐतिहासिक नळदुर्ग शहरात 101 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन हा कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

   

युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांनी नळदुर्ग येथे गेल्या वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुढच्या वर्षी नळदुर्ग शहरामध्ये घराघरात शिवजयंती साजरी व्हावी यासाठी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने 101 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची पुर्तता करून कफील मौलवी यांनी नळदुर्गवासीयांना दिलेला शब्द पाळला आहे.


हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात हा संकल्प घेऊन युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने या वर्षी नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 101 पुतळे घरगुती पुजेसाठी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन खासदार ओमराजे निंबाळकर, राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार ज्ञानराज चौगुले, लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, राजेंद्र मिरगणे हे उपस्थित राहणार आहेत. तर भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शहाजी पवार, उद्योजक  दत्तात्रय मुळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अनिल गोटे,  तहसिलदार सौदागर तांदळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड. अनिल काळे, सोलापुरचे गड संवर्धन समितीचे आनंद देशपांडे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, सुहास येडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शफी शेख, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.