रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण : निकाळजे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम

रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण : निकाळजे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम

वागदरी ,दि.१५:एस.के.गायकवाड

आंबेडकरी चळवळीतील स्मृतिशेष शिवाजी पंडा निकाळजे रा. दिंडेगांव ता.तुळजापूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्रांनी परंपरेने चालत आलेली *अंत्यविधीच्या तिसऱ्या दिवशी नदीत केले जाणार्‍या रक्षाविसर्जनाला* फाटा देत आपल्या वडिलांनाच्या अस्थी रक्षाविसर्जन आपल्या शेतात एक फळांचे झाड लावून व्रक्षारोपनाने करून समाजापुढे एक आदर्श घातला आहे.


 आपण नेहमी जलप्रदूषणावर बोलतो, लिहतो, ऐकतो जलप्रदूषणामुळे होणारे तोटेही माहिती असतात *परंतू  परंपरेने चालत आलेल्या रुढी च्या विरुद्ध कृतीला सहसा कुटुंबियांचे मन धजावत नसते*.
 परंतू दिंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच गोपीचंद निकाळजे व खंडू निकाळजे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःच्या शेतजमिनीत फळाचे झाड लावून व्रक्षारोपनाच्या खड्ड्यात रक्षाविसर्जन करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.


अशा कृतीमामागची भूमिका स्पष्ट करतांना *दिंडेगांवचे उपसरपंच गोपी निकाळजे व त्यांचे बंधू खंडू निकाळजे* यांनी सांगितले की, *आमचे वडिल वृक्षाच्या रुपाने चिरंतन जीवंत असल्याची जाणीव क्षणोक्षणी आम्हा कुटुंबियांना होईल.तसेच हा वृक्ष वडिलांच्या स्मृतित लावला गेला असल्याने घरातील प्रत्येकजण त्याची विशेष काळजी घेवून जोपासेल* तसेच दिवसेंदिवस वृक्षाप्रतीचा आदर कमी होत असल्याने बेसुमार वृक्षतोड होते परंतू अशाप्रकारे *घरच्या व्यक्तीच्या आठवणीत वृक्षारोपण केल्यामुळे कुटुंबियांना त्या वृक्षाप्रती एक वेगळाच आदरभाव निर्माण होईल यामुळे त्या झाडाची फांदी तोडण्याअगोदर घरातील प्रत्येकजण हजारदा विचार करेल, अशामुळे खूप काही  सकारात्मक विचार वृक्षासंदर्भात निर्माण होतील .घरातील लहान मुलांमध्ये सुद्धा वृक्षसंवर्धनाबद्दल सकारात्मक बदल घडून येईल.असे अतिशय पर्यावरणवादी विचार गोपीचंद निकाळजे व खंडू निकाळजे यांनी मांडले. खरोखरच प्रत्येकांनी असा पथदर्शी हा स्तुत्य उपक्रम सुरू करायला हवा. आपल्या कुटुंबियातील व्यक्तीच्या निधनानंतर ही ती व्यक्ती  वृक्षरुपाने जीवंत राहिल..