ना. रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतल्याने नळदुर्ग येथे जल्लोष

ना. रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतल्याने नळदुर्ग येथे जल्लोष 

वागदरी एस.के.गायकवाड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतल्याने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
  
 लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपतविधी सोहळ्यात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा  केंद्रीय मंत्री मंडळात मंत्री पदाची शपथ घेतल्याने नळदुर्ग येथे रिपाइं कार्यकर्त्यांनी  बसस्थानका समोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात बॅनरनबाजी करून फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करून जल्लोष केला.
  
याप्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, अल्प संख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष बाशिदभाई कुरेशी, तालुका कार्यकारणी सदस्य दत्ता बनसोडे नळदुर्ग शहर उपाध्यक्ष दत्ता सुरवसे रिपाइं चे जयभीम वाघमारे, जेष्ठ कार्यकर्ते नामदेव आण्णा बनसोडे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.