महात्मा पब्लिक स्कूलच्या बालकलाकांराचा कलाविष्कार ! स्नेहसंमेलनामध्ये उदगीरवासीय झाले मंत्रमुग्ध!

महात्मा पब्लिक स्कूलच्या बालकलाकांराचा कलाविष्कार ! स्नेहसंमेलनामध्ये उदगीरवासीय झाले मंत्रमुग्ध !

उदगीर ,दि.०९

स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान द्वारा संचलित येथील देगलूर रोडवरील नाईकनगर चौक स्थित महात्मा पब्लिक स्कूल मध्ये दि.०७ जानेवारी शनिवारी रोजी दु. ४ वाजता रघुकुल मंगल कार्यालयात स्नेहसंमेलन पार पडले.

 या कार्यक्रमांमध्ये महात्मा पब्लिक स्कूलच्या स्थापनेपासूनच्या परंपरेला व सांस्कृतिक साजेसा असा उत्कृष्ट , कलाउत्कृष्ट व विद्यार्थ्यांच्या अद्भुत कला गुणांना वाव देणारा असा सांस्कृतिक कार्यक्रम व प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तमपणे बालाविष्कार, कलाविष्कार सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः स्वामी विवेकानंद व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीप प्रज्वलानी करण्यात आली. अध्यक्षस्थानी नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वास पडीले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल व औषधी असोसिएशनचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान बोरोळकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, उदगीर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले,  महिला आघाडीच्या उत्तराताई कलबुर्गे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक नेत्रगावेपाटील, सचिव सौ.संगीताताई दिपकराव नेत्रगावेपाटील, राष्ट्रवादी कला व सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, मानकीचे माजी सरपंच सतीश पाटील मानकीकर, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व सिद्धी करिअर ॲकाडमीच्या संचालिका सौ.नंदाताई स्वामी, शांतकुमार स्वामीसर, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.संध्या बालासाहेब शिंदे अतनूरकर, सामाजिक कार्यकर्त्या चंचलाताई हुगे उपस्थित होते.


या कार्यक्रमांमध्ये बालकलाकारांचा कलाविष्कार बक्षिसांची व या शाळेची गुणवला, उपक्रमशीलता, नैपुण्य हे इतरांपेक्षाही आगळे वेगळे व नजरेत भरणारे होते. यामध्ये लहान बालकांनी, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोककला लावणी, धनगर गीते, भक्ती गीते, लोकगीते, राष्ट्रगीते, रिमिक्स गाणे, मनोहर नृर्त्यांसह सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, कर्ण मधुर संगीत व प्रेक्षकांचा अमर्यादा त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. प्रथम, द्वितीय, तृतीय, चर्तुथ क्रमांक विद्यार्थ्यांचे व मातापालकांचे ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन स्वागत व अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविधता होती. विद्यार्थ्यांचे विविध कलागुणांचा अविष्कार होता. कार्यक्रमाची विशेष म्हणजे कुमारी साक्षी संगीताताई दीपकराव नेत्रगावेपाटील, या आडीचतीन वर्षांच्या चिमुकल्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद्ध, कर्मचारी यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक आनंदा चिंचोले यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद चिंचोले यांनी केले. प्रास्ताविक भाषण स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपकराव नेत्रगावेपाटील यांनी केले. आभार स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या संस्थापिका सचिव तथा प्राचार्या सौ.संगीताताई दिपकराव नेत्रगावेपाटील यांनी मानले.

 सर्व पालक वर्ग, माता भगिनी हजर होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा पब्लिक स्कूल शाळेचे मुख्याध्यापक आनंद चिंचोले यांनी केले. तसेच महात्मा पब्लिक स्कूल शाळेच्या सर्व शिक्षिका वृंद व कर्मचाऱ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनातील वेशभूषा व इतर महत्त्वाच्या बाबी प्रभावीपणे सांभाळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. हा कार्यक्रम सर्वांच्या मेहनतीने यशस्वी झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र, अहोरात्र मेहनत, परिश्रम घेणाऱ्या संस्थेच्या संचालिका तथा प्राचार्या सौ.संगीताताई दिपकराव नेत्रगावेपाटील यांचा सुद्धा यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात आला.