राजे उमाजी नाईक यांच्या 193 व्या पुण्यतिथीनिमित्त उमरग्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
राजे उमाजी नाईक यांच्या 193 व्या पुण्यतिथीनिमित्त उमरग्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
मुरुम,दि.०९
तालुक्यातील बेडर,बेरड,रामोशी,बहुजन समाज व जय मल्हार क्रांती संघटना संघटनेच्या वतीने
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 193 वी पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजे उमाजी नाईक चौक बायपास रोड उमरगा येथे घेण्यात आले. या शिबीरात ५० युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या पुण्यतिथी प्रसंगी आमदार प्रवीण स्वामी, तहसीलदार गोविंद एरमे,नायब तहसीलदार रतन काजळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण कुकुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासाठी आयोजक अशोक ममाळे, नागनाथ कोराळे, दिलीप कलमले, महेश व्हनाळे, राहुल खवडे, कन्हैया बुकले, नितीन कुकुर्डे, मारुती पाटील, सचिन जमादार, गोपाळ वासुदेव, कृष्णा जमादार, ज्ञानेश्वर यंपाळे, रायान्ना बुकले, शाहूराज जमादार, नेताजी मंडले, तुकाराम ममाळे, काशिनाथ जमादार यांच्यासह श्रीकृष्ण रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.





















